सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरवली जाणार आहेत.

 दिव्यांग व ज्येष्ठांनी कृत्रिम अवयव व साधने आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घ्या

-मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा


 सातारा जिल्ह्यातील  सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरविणे या केंद्र शासनाच्या  सामाजिक न्याय व अस्थिव्यंगाकरिता मंत्रालयाच्या ADIP (Scheme of Assistance to Disable Persons for purchase/fitting of Aids Appliances) व राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY) या योजनेद्वारे जिल्हा प्रशासनाकडून लाभ मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय  गौडा यांनी दिली.


 या  योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना गरजेनुसार व अलिम्को कानपूर, उत्तरप्रदेश येथील तज्ञांच्या सल्ल्याने तीन चाकी सायकल,व्हील चेअर, मोटारइज्ड ट्रायसायकल, कॅलिपर्स, कुबड्या, कृत्रीम हात-पाय, श्रवणयंत्रे, विविध प्रकारच्या काठया,  ब्रेल कीटस्, एम.आर.किटस्, नंबरचा चष्मा, स्मार्ट फोन इत्यादी कृत्रीम अंग व साधने जिल्हा प्रशासन, सातारा व जिल्हा परिषद, सातारा यांच्या संयुक्त  प्रयत्नाने मिळवून देण्यात येणार आहे.


 ही कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करुन घेण्यासाठी संबंधीत लाभार्थ्यांने नागरी सुविधा केंद्राकडे नाव नोंदणी करुन घ्यावी त्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रक आवश्यक आहेत.


अ. दिव्यांगाकरिता  :  सिव्हील सर्जन यांचा दिव्यांगत्वाचा वैद्यकीय दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार/तलाठी/नगरसेवक) वार्षिक उत्पन्न रु. 180000/-, दोन पासपोर्ट साईज फोटो.


आ. ज्येष्ठ नागरिकांसाठी  - आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार/तलाठी/नगरसेवक), दोन पासपोर्ट साईज फोटो, वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न रु. 180000 पर्यंतच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात.


          या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन टप्प्यात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

*पहिला टप्पा*

 कराड तालुका :

     दिव्यांगाकरिता दि. 17 डिसेंबर 2021, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता दि. 18 डिसेंबर 2021




          दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. 28 जानेवारी 2022 पासून उर्वरित तालुक्यांमध्ये मोजमाप शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.


Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post