शेतकरी बंधूंना आनंदाची बातमी आहे की खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे.
ज्या शेतकरी बंधूंनी खरीप हंगामामध्ये आपल्या पिकाचा विमा उतरवला आहे, त्या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबद्दल भरपाईची रक्कम पिक विमा कंपनी तर्फे देण्यात येत आहे. खरीप हंगाम मध्ये अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सोयाबीन पिकाचा विमा जास्त उतरवला गेला. आता शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होत आहे.
ज्या शेतकऱ्याची पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही त्यांनी तक्रार कोठे करावी?
काही शेतकऱ्यांची पिक विम्याची रक्कम जमा होत नाही त्यांनी त्याची तक्रार त्यांच्या बँकेमध्ये किंवा विमा कंपनी कडे न करता त्याची तक्रार त्यांच्या तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये करायचे आहे. याची दखल तातडीने घेऊन ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसानभरपाईची विम्याची रक्कम देण्यात येईल.