जनसामान्य लोकांना कमी रुपयांमध्ये, विमा संरक्षण मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना ही योजना आणली आहे. ही एक मुदत विमा योजना आहे ज्यामध्ये तुम्ही वर्षाला 360 रुपये गुंतवता आणि त्या बदल्यात तुम्हाला संपूर्ण वर्षभर विमा संरक्षण मिळते ज्यामध्ये वर्षभरात विमाधारक व्यक्तीचा मृत्यू कोणत्याही कारणाने झाला तर त्याच्या कुटुंबातील वारस व्यक्तीला दोन लाख रुपये मिळतात. कुटुंबातील एखाद्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवते. म्हणून हा विमा जनसामान्य लोकांच्या हिताचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना हा एक मुदत विमा योजना प्रकार आहे. त्यामध्ये तुम्ही एक वर्षासाठी विमा संरक्षण विकत घेता आणि दरवर्षी विम्याचे नूतनीकरण करता.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना मध्ये फक्त तीनशे साठ रुपयांमध्ये एक वर्षासाठी विमा संरक्षण मिळते. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळते.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना मध्ये व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मिळतात.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन घेऊ शकता त्यासाठी आधार कार्ड आयडेंटी साईज फोटो आणि बँक पासबुक आवश्यक असते.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना 18 वर्ष ते 50 वर्ष या वयोगटातील व्यक्ती चालू करू शकतात. एकदा विमा चालू झाल्यानंतर प्रत्येक वर्षी बँक खात्यामधून 360 रुपये कट होतात आणि आपल्याला दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण प्रत्येक वर्षी मिळते. वयाच्या 55 व्या वर्षानंतर हा मुदत विमा संपुष्टात येतो.