शेतामध्ये ठिबक सिंचन बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? ठिबक सिंचन ८०% अनुदानासाठी अर्ज कसा करावा?

 


नमस्कार शेतकरी बंधुनो, तुम्हाला तुमच्या शेतामध्ये ठिबक सिंचन बसवायचे असल्यास आणि आपल्या शेतीचे उत्पादन वाढवायचे असल्यास ही पोस्ट तुमच्या साठी महत्वाची आहे. ठिबक सिंचन हि शेतामध्ये पिकाला पाणी देण्याची आधुनिक पद्धत आहे. ज्यामध्ये पिकाला पाणी गरजेनुसार थेंबा थेंबाने दिले जाते, त्यामुळे पिकाला योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होतो आणि पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे पिकाची उत्पादन क्षमता वाढून उत्पादन दुपटीने वाढते आणि खर्च कमी होतो. 


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - प्रति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)

शेतकरी बंधुनो, तुम्हाला ८० टक्के अनुदानावर ठिबक सिंचन बसवायचे असल्यास तुमच्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही आहे. या योजनेमध्ये ८० टक्के ते ९०  % पर्यंत अनुदान दिले जाते. 

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला शेतीचा सातबारा आणि खाते उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात. 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये तुम्ही ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन्ही योजनांसाठी अर्ज करू शकता.


ठिबक सिंचन बसवण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्यावर अर्ज करून, तुम्ही 80 टक्के पर्यंत शासनाकडून अनुदान मिळू शकता.


ठिबक सिंचन ऑनलाइन अर्ज 

ऑफिशिअल वेबसाईट 

-

👇

https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login


Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post